Babel

The Tower of Babel (Genesis 11: 1-9)

मराठी (Marathi)

  1. जलप्रलयानंतर पृथ्वीवरील सर्व लोकांची एकच भाषा व एकच बोली होती,
  2. लोक पूर्वेकडून पुढे निघाले तेव्हा जाता जाता शिनार देशात त्यांना एक मोठे मैदान लागले आणि मग त्यांनी तेथेच वस्ती केली.
  3. लोक म्हणाले, “चला, आपण विटा करु व त्या विस्तवात भाजू म्हणजे त्या खूप कठीण होतील; “तेव्हा लोकांनी घरे बांधण्यासाठी दगडाऐवजी विटांचा आणि चुन्याऐवजी डांबराचा उपयोग केला.
  4. मग लोक म्हाणाले, “चला, आपण आपणासाठी नगर बांधू; आणि आकाशाला भिडणारा उंचच उंच बुरुज बांधू; असे केले तर मग आपण नावाजलेले लोक होऊ व आपण पांगले जाणार नाहीं तर एके जागी एकत्र राहू.”
  5. परमेश्वर ते नगर व तो उंच बुरुज पाहण्यासाठी खाली आला. लोक ते बांधीत आहेत असे परमेश्वराने पाहिले.
  6. तेव्हा परमेश्वर म्हणाला, “हे सर्व लोक एकच भाषा बोलतात आणि हे बांधणीचे काम करण्यासाठी ते सगळे एकत्र जमले आहेत, ते काय करु शकतात त्याची ही तर नुसती सुरवात आहे; लवकरच ते त्यांना जे पाहिजे ते करु शकतील,
  7. तेव्हा आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करुन टाकू; मग मात्र त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाहीं,”
  8. तेव्हा परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली म्हणून नगर व बुरुज बांधण्याचे काम तसेच राहिले.
  9. ह्याच ठिकाणी परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला म्हणून त्या नगराला बाबेल म्हटले आहे. अशा रीतीने परमेश्वराने त्या ठिकाणापासून इतरत्र पसरण्यास लोकांना भाग पाडले.

Source: http://etabetapi.com/read/mr/Gen/11

Transliteration

  1. Jalapralayānantara pr̥thvīvarīla sarva lōkān̄cī ēkaca bhāṣā va ēkaca bōlī hōtī,
  2. lōka pūrvēkaḍūna puḍhē nighālē tēvhā jātā jātā śināra dēśāta tyānnā ēka mōṭhē maidāna lāgalē āṇi maga tyānnī tēthēca vastī kēlī.
  3. Lōka mhaṇālē, “calā, āpaṇa viṭā karu va tyā vistavāta bhājū mhaṇajē tyā khūpa kaṭhīṇa hōtīla; “tēvhā lōkānnī gharē bāndhaṇyāsāṭhī dagaḍā'aivajī viṭān̄cā āṇi cun'yā'aivajī ḍāmbarācā upayōga kēlā.
  4. Maga lōka mhāṇālē, “calā, āpaṇa āpaṇāsāṭhī nagara bāndhū; āṇi ākāśālā bhiḍaṇārā un̄caca un̄ca buruja bāndhū; asē kēlē tara maga āpaṇa nāvājalēlē lōka hō'ū va āpaṇa pāṅgalē jāṇāra nāhīṁ tara ēkē jāgī ēkatra rāhū.”
  5. Paramēśvara tē nagara va tō un̄ca buruja pāhaṇyāsāṭhī khālī ālā. Lōka tē bāndhīta āhēta asē paramēśvarānē pāhilē.
  6. Tēvhā paramēśvara mhaṇālā, “hē sarva lōka ēkaca bhāṣā bōlatāta āṇi hē bāndhaṇīcē kāma karaṇyāsāṭhī tē sagaḷē ēkatra jamalē āhēta, tē kāya karu śakatāta tyācī hī tara nusatī suravāta āhē; lavakaraca tē tyānnā jē pāhijē tē karu śakatīla,
  7. tēvhā āpaṇa khālī jā'ūna tyān̄cyā bhāṣēcā ghōṭāḷā karuna ṭākū; maga mātra tyānnā ēkamēkān̄cē bōlaṇē samajaṇāra nāhīṁ,”
  8. tēvhā paramēśvarānē pr̥thvībhara tyān̄cī pāṅgāpāṅga kēlī mhaṇūna nagara va buruja bāndhaṇyācē kāma tasēca rāhilē.
  9. Hyāca ṭhikāṇī paramēśvarānē sarva pr̥thvīcyā bhāṣēcā ghōṭāḷā kēlā mhaṇūna tyā nagarālā bābēla mhaṭalē āhē. Aśā rītīnē paramēśvarānē tyā ṭhikāṇāpāsūna itaratra pasaraṇyāsa lōkānnā bhāga pāḍalē.

[top]


Green Web Hosting - Kualo

Why not share this page:

 

Learn a Language with gymglish

If you like this site and find it useful, you can support it by making a donation via PayPal or Patreon, or by contributing in other ways. Omniglot is how I make my living.

 

Note: all links on this site to Amazon.com, Amazon.co.uk and Amazon.fr are affiliate links. This means I earn a commission if you click on any of them and buy something. So by clicking on these links you can help to support this site.

Get a 30-day Free Trial of Amazon Prime (UK)

If you're looking for home or car insurance in the UK, why not try Policy Expert?

[top]

iVisa.com